अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू नजीब तारकाई याचे २९ व्या वर्षी निधन

7

नवी दिल्ली, ७ ऑक्टोबर २०२०: कोरोना काळात क्रिकेट विश्वात एक अत्यंत दुःखद घटना घडली आहे. अफगाणिस्तान संघाचा सलामीचा फलंदाज नजीब तरकाई याचे आज २९ व्या वर्षी निधन झाले आहे. नजीब याचा २ ऑक्टोबर रोजी अपघात झाला होता. त्यामध्ये त्याला गंभीर दुखापत झाली होती. कारच्या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला होता. याच कारणास्तव तो कोमामध्ये गेला होता. ४ दिवस आयुष्याला झुंज देत अखेर आज त्याने आपले आयुष्य संपवत जगाचा निरोप घेतला.

शुक्रवारी नजीब हा पूवर नन गाहर येथे असलेल्या एका इलेक्ट्रॉनिक स्टोर मधून बाहेर येऊन नुकताच रस्ता पार करत होता. अशातच एका कार ने त्याला जबरदस्त धडक मारली. आणि याच अपघातात त्याला गंभीर दुखापत झाली.त्यावेळी त्याला रुग्णालयात घेऊन जाण्यात आले. डोक्याला जबरदस्त मार लागल्यामुळे नजीब कोमा मध्ये चालला गेला होता. या घटनेनंतर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने दुःख व्यक्त करत सोशल मीडिया वर लिहले.” अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड आणि क्रिकेट प्रेमी यांनी देशाच्या एका आक्रमक सलामी फलंदाजाला गमावले आहे. एका अपघातात त्याचा मृत्यू झाला आहे. आणि सर्व स्तब्ध आहोत. ”

नजीब याने अफगाणिस्तान संघाकडून खेळताना १ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला आहे. तसेच एक टी- २० सामना खेळला आहे. यात त्याने अत्यंत चांगली कामगिरी केली आहे. त्याने आपल्या प्रथम श्रेणी क्रिकेट मध्ये ही उत्तम कामगिरी करत २४ सामन्यात २०३० धावा केल्या आहेत. यात त्याने सहा शतक आणि १० अर्धशतक केली आहेत. त्याच्या धावांची सरासरी ही ४७ पेक्षा ही जास्त होती.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अंकुश ढावरे