पुणे, ११ ऑगस्ट २०२३ : अखेर रशियाने आपली चंद्र मोहीम लुना-२५ लाँच केली आहे. १९७६ नंतर रशियाने आता चंद्रावर वाहन पाठवले आहे. अमूर ओब्लास्टच्या वोस्टोनी कॉस्मोड्रोम येथून हे प्रक्षेपित करण्यात आले आहे. जे मॉस्कोच्या पूर्वेला ५,५५० किमी अंतरावर असल्याचे सांगितले जाते. रशियाचे हे विशेष वाहन Soyuz 2.1B रॉकेटच्या मदतीने लॉन्च करण्यात आले आहे. हे रॉकेट सुमारे ४६.३ मीटर लांब आहे. आणि त्याचा व्यास १०.३ मीटर आहे. त्याचे वजन ३१३ टन आहे. या चार टप्प्यातील रॉकेटने लुना-२५ लँडर पृथ्वीच्या बाहेर गोलाकार कक्षेत सोडले आहे.
रशियाची स्पेस एजन्सी रोस्कॉस्मोस (Roscosmos) नुसार, लुना-२५ चंद्राच्या दिशेने गेले आहे. ते ५ दिवस चंद्राकडे फिरत राहील. यानंतर ते ७-१० दिवस आपल्या कक्षेत फीरेल. २१ किंवा २२ ऑगस्ट रोजी ते चंद्राच्या पृष्ठभागावर उतरू शकते. लुना-२५ मध्ये रोव्हर आणि लँडर आहे. चार पायांच्या या लँडरचे वजन ८०० किलो आहे. लुना-२५ सॉफ्ट लँडिंगचा सराव करणार असल्याचे वृत्त आहे. चंद्रावरील मातीचे नमुने गोळा करून त्यांचे विश्लेषण करण्याचेही ते काम करेल. यासोबतच तो चंद्राच्या पृष्ठभागावर दीर्घकाळ आपले विशेष संशोधन करणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड