आषाढी, कार्तिकीनंतर पंढरपूरची माघी यात्रा रद्द

पंढरपूर, ६ फेब्रुवरी २०२१: कोरोनामुळे गेल्या वर्षी आषाढी आणि कार्तिकी यात्रा रद्द झाली होती. त्यामुळे अनेक भाविक दुःखी झाले होते. परंतु वर्षातील पहिली वारकरी यात्रा मानली जाणारी माघी यात्रा देखील रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २२-२३ फेब्रुवारीला मंदिर भाविकांसाठी बंद राहणार असल्याचे मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

यानुसार मंदिर परिसर, चंद्रभागेचे वाळवंट आणि प्रदिक्षणा मार्ग या परिसरामध्ये कलम १४४ लागू करण्यासाठी म्हणजेच संचार बंदीसाठी चा प्रस्ताव शासनाकडे पाठवला असल्याचे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सांगितले आहे.

कोरोनाचे सावट अजूनही संपलेले नाही त्यामुळे आधीपासूनच पंढरपूरच्या या पहिल्या सोहळ्यावर बंदीचे सावट होते. यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे आता पोलिसांनी त्रि स्तरीय सुरक्षा नाकाबंदीचे नियोजन केले आहे. यात सोलापूर जिल्ह्याच्या सेमेलाच सर्वप्रथम भाविकांना अडविले जाईल. यातूनही काही भाविक पुढे आले तर तालुका स्तरिय नाकाबंदी असेल. नंतर शहराच्या भोवती देखील मोठी नाकाबंदी असणार आहे.

या पद्धतीने पोलिसांनी पूर्ण खबदरी घेत आपली सुरक्षा तयार केली आहे. जेणेकरून भाविकांची गर्दी होऊन पुन्हा कोरोनाणे डोके वर काढू नये. यामुळे एकादशीला दोन दिवस मंदिर परिसर बंद राहणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा