पुणे, १४ जुलै २०२३ : संसाराचा गाडा हाकताना पती-पत्नीमध्ये कुरबुर, छोटी मोठी भांडणे ही होतच असतात. परंतु त्यानंतरही त्याच्याकडे डोळे झाक करत, पुन्हा दुसऱ्या दिवशी नित्यनियमाने आपला संसार सुरू ठेवतात.परंतु पुणे शहरात भयावह घटना घडली. पत्नीने पतीवर उकळते पाणी टाकले आहे. एका क्षुल्लक कारणावरुन पतीने पत्नीवर उकळते पाणी टाकले आहे. या घटनेत पती गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणाची तक्रार वारजे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
पुण्यातील वारजे भागात धक्कादायक घटना घडली. महादेव जाधव वय ३०, रा. काजल हाइट्स, शिवणे हे त्यांच्या पत्नीसह राहतात. त्यांचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय आहे. माधव नेहमीप्रमाणे झोपले होते. पहाटे साडेतीन वाजता त्यांच्या पत्नीने त्यांच्या अंगावर उकळते पाणी टाकले. त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना शिवणे परिसरात घडली. या घटनेत महादेव जाधव गंभीररीत्या भाजला आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
महादेव जाधव यांनी त्यांच्या पत्नीच्या भावाला २ लाख ४० हजार रुपये हातउसने दिले होते. पत्नीच्या भावाला दिलेले हे पैसे ते सतत मागत होते. त्यावरुन दोघा पती, पत्नीमध्ये भांडणही होत होते. त्यामुळे रागाच्या भरात पत्नीने पहाटे साडेतीन वाजता महादेव जाधव झोपले असताना त्यांच्या अंगावर उकळलेले पाणी टाकले. त्यात ते ५०% भाजले गेले. याबाबत महादेव जाधव यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. यावरून वारजे पोलिस ठाण्यात पत्नीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर












































