अमेरिका, ३ ऑक्टोबर, २०२२ : सध्या भारताचे पाऊल पुढे पडत आहे. त्यामुळे आता हे पाऊल पृथ्वीवरुन नंतर आता मंगळावर पोहोचले आहे. भारताची मंगळयान मोहिम तब्बल आठ वर्ष आणि आठ महिन्यांनी संपली.
अखेर आठ वर्ष काम करणाऱ्या मंगळयानाचा संपर्क तुटला आहे. आठ वर्ष चालणारे मार्स ऑर्बिटर मिशन अखेर संपलं. मंगळयानाचं इंधन संपलं आणि बॅटरीही डाऊन झाली. यानंतर मंगळयानाचा संपर्क तुटला. भारतानं हे यानं ५ नोव्हेंबर २०१३ ला लाँच केलं होतं. ते २४ सप्टेंबर २०१४ ला मंगळाच्या कक्षेत पोहोचलं होतं. त्या मिशनद्वारे भारत जगातील पहिला देश बनला होता जो थेट मंगळ ग्रहापर्यंत पोहोचला होता.
मंगळयान मोहिम ही त्याच्या नियोजित वेळेपेक्षा १६ पटीनं जास्त काळ चालली. वास्तविक ही मोहिम केवळ फक्त सहा महिन्यांसाठी चालवण्यात येणार होती. मात्र मंगळयानानं आठ वर्ष काम केलं. मंगळयानाने मंगळावरील अनेक फोटो पृथ्वीवर पाठवले आणि डेटाही पोहोचवला. ज्यामुळे अंतराळातील जगाविषयी आणि मंगळाबद्दलची माहिती आपल्यापर्यंत पोहोचली. मंगळयानाने केलेलं हे काम केलं आहे जे आजपर्यंत कोणत्याही देशाच्या अंतराळयानाने केलेलं नाही.
मंगळयान २०१३ मध्ये प्रक्षेपित करण्यात आले. त्याचे प्रक्षेपण PSLV-C25 द्वारे करण्यात आले. मार्स ऑर्बिटर मिशन हे भारताचे पहिले इंटरप्लॅनेटरी मिशन म्हणून प्रक्षेपित करण्यात आले. मंगळ मोहिमेने भारताला अवकाशाच्या जगात एका नव्या उंचीवर नेले. ख-या अर्थाने भारताने आकाशझेप हा शब्द खरा केला, हे दिसून आलं .
न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस