गौरी पूजनानंतर उतरला फुलांचा भाव

11

हडपसर, दि. २८ ऑगस्ट २०२० : गौरी पूजनानंतर मार्केट यार्डातील फूल बाजारात सर्व प्रकारच्या फुलांची मागणी घटली आहे. पावसाने विश्रांती घेतल्याने बाजारात दर्जेदार फळे दाखल होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. बाजारात दाखल होत असलेल्या मालाच्या तुलनेत मागणी घटल्याने पाच दिवसापूर्वी झेंडूचे २५० ते ३०० रुपये प्रति किलोपर्यंत पोहचले आहे. फुलांचा भाव २० ते ६० रुपयांपर्यंत खाली आले आहेत.

गेल्या काही दिवसात गणरायावर गौरी गणपतीपुळे झेंडू, शेवंती, गुलछडी, यासह गुलाब झरबेरा आदी फुलांना मागणी वाढली होती. या काळात पाऊस झाल्याने बहुंताश फुलांची प्रतवारी ढासळली होती. परिणामी गणराया व गौरी आगमनाच्या पार्श्वभूमीवर झेंडूच्या फुलांना मागणी वाढल्याने यंदा झेंडूला उच्चांकी दर मिळाला. फुलांच्या भावातही वाढ झाली, गौरी पूजनानंतर फुलांना मागणी घटल्याने फुलांच्या भावात पुन्हा घसरण झाली आहे. यामध्ये झेंडूच्या फुलांच्या भावात ३० टक्क्यांनी घसरण झाली आहे. गणेशोत्सवामुळे फुलांना मागणी चांगली आहे. तोपर्यंत फुलांना मोठी मागणी राहते कोरोनामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत मागणी कमी असली, तरी भाव समाधानकारक आहेत. गणेश उत्सवापर्यंत फुलांना तुरळक मागणी राहील.

त्यानंतर, पितृपक्ष व अधिक मास सुरू होणार आहे. या काळात मागणीत आणखी घट होऊन दरात घसरण होण्याची शक्यता असल्याचे अखिल पुणे फुल बाजार आडते असोसिएशनचे अध्यक्ष अरुण विर आणी सागर भोसले यांनी सांगितले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वर शिंदे