पुणे, २३ फेब्रुवरी २०२३: खासगी क्षेत्रातील बँका त्यांच्या ग्राहकांना सतत खुशखबर देत असतात. प्रथम एचडीएफसी बँकेने त्यांच्या एफडीवरील व्याजदरात वाढ केली, आता आयसीआयसीआय बँकेने पुन्हा एकदा एफडी व्याजदरात वाढ केली आहे. एका महिन्यातच बँकेकडून ही सलग दुसरी वाढ आहे. बँकेने २ कोटी रुपयांपासून ५ कोटी रुपयांपर्यंतच्या एफडीवरील व्याजदरात वाढ केलीय.
१५ महिन्यांच्या FD वर सर्वाधिक व्याज
ICICI बँकेने बल्क एफडीवरील व्याजदरात ०.२५ टक्के म्हणजेच २५ बेस पॉइंट्सने वाढ केलीय. यापूर्वी ७ फेब्रुवारीलाही बँकेने व्याजदरात वाढ केली होती. ICICI बँकेकडून EFI मिळवणाऱ्या ग्राहकांना आता ७ दिवसांपासून ते १० वर्षांपर्यंतच्या FD वर ४.७५% ते ७.१५% व्याजदर दिला जात आहे. सर्वाधिक व्याज १५ महिन्यांच्या मुदत ठेवीवर मिळत आहे.
बदलानंतरचे नवे दर
नवीन दरांनुसार, ICICI बँक आपल्या ग्राहकांना ७ ते १४ आणि १५ ते २९ दिवसांच्या FD वर ४.७५%, ३० ते ४५ दिवसांसाठी ५.५०% ऑफर करत आहे. ६१ ते ९० दिवसांवर ६%, ९१ ते १२० दिवस आणि १२१ ते १५०, १५१ ते १८४ दिवस ६.५०%, १८५ ते २१०, २११ ते २७०, २७१ ते २८९ आणि २९० एक वर्षापेक्षा कमी कालावधीत ६.६५% दराने व्याज देत आहे. याशिवाय १ वर्ष ते ३८९ दिवस, ३९० ते १५ महिन्यांपेक्षा कमी आणि १५ महिने ते १८ महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी ७.१५% व्याजदर आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे