मनीष सिसोदिया यांच्यानंतर ‘आप’चे अन्य तीन नेतेही तपास यंत्रणांच्या रडारवर

नवी दिल्ली, १ मार्च २०२३ : मद्य घोटाळा प्रकरणात दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात सत्येंद्र जैन हे ‘आप’चे दोन महत्त्वाचे नेते सध्या कोठडीत आहेत. दरम्यान, ‘आप’च्या या दोन्ही नेत्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. याचबरोबर दिल्ली सरकारमधील आणखी काही नेते देखील तपास यंत्रणेच्या रडारावर आहेत. सध्या या नेत्यांची कोणतीही चौकशी जरी सुरू नसली, तरी त्यांच्यावर गंभीर आरोप असल्याने भीतीचे टांगती तलवार कायम आहे.

सत्येंद्र जैन, मनीष सिसोदिया यांच्याशिवाय ‘आप’चे कैलाश गेहलोत, राघव चड्डा आणि दिल्ली संवाद आयोगाच्या प्रमुख जस्मिन शाह हे प्रमुख देखील तपास यंत्रणेच्या रडारावर आहेत. ‘आप’चे मंत्री मनीष सिसोदिया यांना मद्य घोटाळा प्रकरणी नुकतीच अटक करण्यात आली असून, त्यांना न्यायालयाने चार मार्चपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे. सिसोदिया यांनी मंत्रिमंडळातील आपल्या पदांचा राजीनामा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडे सुपूर्द केला आहे.

सिसोदिया यांच्याकडे अर्थ मंत्रालय आणि वित्त मंत्रालय अशा एकूण १८ विभागांची जबाबदारी होती. आता हे खाते दिल्ली सरकारच्या इतर मंत्र्यांमध्ये वाटण्याची चर्चा आहे. यामध्ये दिल्ली सरकारचे मंत्री कैलाश गेहलोत हे अरविंद केजरीवाल यांच्या जवळचे मानले जातात. वित्त विभागासह अनेक महत्त्वाची खाती त्यांच्याकडे सोपविली जाऊ शकतात; मात्र गेहलोत यांच्यावर यापूर्वीही अनेक खटले प्रलंबित आहेत. यामुळेच त्यांच्यावर ‘सीबीआय’च्या तपासांचा सामना करावा लागू शकतो, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा