डोंबिवली, ३० जुलै २०२० : डोंबिवली शहर म्हटलं की लोकांना आठवते ती लोकलची गर्दी आणि सांस्कृतिक वारसा लाभलेलं. शहर . “या डोंबिवलीच्या बायका म्हणजे खरच कहर आहेत” असं या डोंबिवली शहराबद्दल आणि येथील लोकांबद्दल म्हटलं जातं डोंबिवली शहर तेथील परिसर आणि तेथील पूल हे नेहमीच चर्चेत असतात . त्यातला पूर्व पश्चिम जोडणारा ब्रीज जो एक वर्षापूर्वी बांधकामासाठी काढला होता तो आता पूर्ण झाला.
पावसाळ्यात रेल्वे पूल कोसळण्याच्या अनेक घटना या घडत असतात. एक वर्षापूर्वी एल्फिन्स्टन पादचारी पूल हा भर गर्दीत कोसळला होता. त्यामुळे त्यानंतर मुंबई मधील सर्व पुलांची पाहणी करण्यात आली आणि कमकुवत झालेल्या पुलांची डागडुजी करण्यात आली आणि त्यातच डोंबिवलीच्या पादचारी पुलाचा सुद्धा समावेश होता . हा ब्रीज डोंबिवली पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा होता, मात्र हा पूल बंद असल्याने नागरिकांची गैरसोय व्हायची आता या पुलाची बांधणी पूर्ण झाली असून प्राथमिक चाचणी वरून हा पूल रहदारीसाठी तयार असल्याचे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने सांगितले.
लॉकडाऊनच्या काळात आयुक्तांनी स्वतः या ठिकाणी जाऊन पुढील ४ ते ५ महिन्यांमध्ये काम पूर्ण करण्याचे आदेश दिले होते आणि याची अंमलबजावणी सुद्धा करण्यात आली. अखेर लॉकडाऊनचा फायदा घेत हे काम पूर्ण झाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले. कारण या पुलाचे काम सुरू असल्याने इतर २ पादचारी पुलावर सततची गर्दी पाहायला मिळत असत आणि गर्दीतून फलाटापर्यंत पोहचेपर्यंत आलेली ट्रेन निघून जात असे त्यामुळे नागरिक त्रस्त होते मात्र लॉकडाऊन नंतर ट्रेन सुरू झाल्यानंतर ही गर्दी कमी होईल या आशेने नागरिक सध्या आनंदात आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी : राजश्री वाघमारे