मणिपूर, २१ जुलै २०२३ : राजस्थानपाठोपाठ आता मणिपूरमध्येही ३.५ तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपाचा केंद्रबिंदू उखरुलमध्ये जमिनीपासून २० किमी खाली असल्याचे सांगण्यात येत आहे. आज पहाटे ५.१५ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. येथे सध्या कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
या प्रकरणावरील नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, आज म्हणजेच शुक्रवारी पहाटे ५.१५ वाजता भूकंप झाला. म्यानमारच्या सीमेला लागून असलेल्या उखरुल जिल्ह्यातील डोंगराळ भागात हे जाणवले. जमिनीच्या पृष्ठभागापासून २० किमी खोलीवर आलेल्या या भूकंपाच्या धक्क्यामुळे लोक सकाळीच घाबरून घराबाहेर पडले. मात्र, या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे तात्काळ वृत्त नाही.
विशेष म्हणजे, जून २०२३ मध्ये देखील म्यानमारच्या सीमेला लागून असलेल्या मणिपूरच्या डोंगराळ उखरुल भागात मंगळवारी भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्याचवेळी, नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (एनसीएस) ने सांगितले की, भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.५ एवढी मोजली गेली.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड