परिक्षा घेतल्या, विद्यार्थी निघाले कोरोना पाॅजिटिव्ह, ६०० पालकांवर गुन्हा दाखल….

केरळ, दि. २४ जुलै २०२०: भारतात कोरोनाने थैमान घातला असून दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे. या महामारीमुळे देशातील शैक्षणिक वेळापत्रकाचे पार तीन तेरा वाजले आहेत. तर अनेक परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या पण काही राजकारण्यांच्या राजकारणामुळे अंतिम टप्प्यातील परिक्षा या घेण्यात आल्या आणि त्याचे गंभीर परिणाम आता समोर आले आहेत.

केरळमध्ये घेण्यात आलेल्या अभियांत्रिकी व वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षेत काही विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक गोष्ट हि समोर आली आहे. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचा भंग केल्याप्रकरणी जवळपास ६०० विद्यार्थ्यांच्या पालकांवर गुन्हे दाखल केले आहेत. केरळमध्ये अभियांत्रिकी, आर्किटेक्चर, वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षेला असलेल्या एका १७ वर्षीय विद्यार्थ्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. तर मंगळवारी २ विद्यार्थी हे कोरोना पॉझिटिव्ह निघाले. केरळ पोलिसांनी परीक्षेला बसलेल्या ६०० विद्यार्थ्यांच्या पालकांवर गुन्हे दाखल केले आहेत.

महाराष्ट्रात राजकारण तापलंय, पण सरकार निर्णयावर ठाम….

महाराष्ट्रात देखील शैक्षणिक मुद्द्यावरुन राजकारण चांगलंच तापललेलं दिसताना आणि काही शहरांमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे परिस्थिती हि बिकट बनली आहे. त्यामुळे राज्य सरकारने ऑनलाईन शैक्षणिक वर्ष सुरू करण्यास सुरूवात केली आसून, अंतिम वर्षाच्या परीक्षांचा निर्णय अजून निश्चित झालेला नाही.

विद्यापीठ अनुदान आयोगाने याविषयी सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. परंतु राज्य सरकार मात्र, परीक्षा न घेण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसत आहे. पण या राजकारणामुळे विद्यार्थांमधे संभ्रम निर्माण झाले असून त्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा