अटल बोगद्या नंतर आता सैन्याचे लक्ष शिंकूला बोगदा बनवण्यावर

लडाख , २८ सप्टेंबर २०२० : चीन आणि पाकिस्तान बरोबर सुरू असलेल्या तणावामुळे हिमालयातील पर्वतीय भागांमध्ये पायाभूत सुविधा प्रकल्प त्वरित पूर्ण होण्याकडे लक्ष दिले जात आहे. सुरक्षेसाठी ९.२ किमी लांबीचा रोहतांग जवळचा बोगदा तयार करण्यात आला आहे.

तज्ञांच्या मते, रोहतांग महामार्गाचा बोगदा घोड्याच्या आकाराचा आहे. ही सिंगल ट्यूब आणि डबल लेन बोगदा समुद्रसपाटीपासून ३ हजार किलोमीटर उंचीवर आहे. सैन्याच्या सीमा रस्ता संघटनेने (बीआरओ) तयार केले आहे. हे नाव माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावावर आहे. हा बोगदा वर्षभर खुला असेल. पंतप्रधान मोदींच्या हस्ते ३ ऑक्टोबरला या बोगद्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे .

अधिकाऱ्यांचे म्हणण्यानुसार आता १३.५ किमी लांबीचा शिंकूला बोगदा लवकरच तयार करण्यावर भर देण्यात येणार आहे. लडाखच्या पुढे जाण्यासाठी सैन्याचा हा तिसरा, सर्वात छोटा आणि सर्वात सुरक्षित पर्यायी मार्ग आहे.अधिकाऱ्यांचा विश्वास आहे की बरालचा (१६,०२० फूट), लाचलुंगला (१६,६२० फूट) आणि तंगलांगला (१७,४८० फूट) येथे तीन-बोगदा बांधण्यापेक्षा शिंकूला बोगदा बनविणे अधिक किफायतशीर आहे. एकदा शिंकूला बोगदा तयार झाल्यावर मनाली-कारगिल महामार्ग देखील वर्षभर खुले राहील.

सशस्त्र सेना मनाली ते कारगिल ते लेह मार्गे प्रवास करतात . हा रस्ता ७०० किमी लांब आहे, दारचा-निमू-पदम रस्ता आणि शिंकूला बोगदा तयार झाल्यानंतर हे अंतर 522 किमी होईल. सैन्यासाठी हा पर्यायी मार्ग म्हणून तयार केला जात आहे. हा दुहेरी लेन रोड सध्या तयार करण्यात येत आहे. २०२३ पर्यंत हे तयार होईल अशी अपेक्षा आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : संदीप राऊत

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा