सुपरस्टार च्या निधनानंतर,दोन फॅन्स ची आत्महत्या,तर दोन जणांचा हार्ट अटॅक ने मृत्यू….

7
कर्नाटक, ३१ ऑक्टोबर २०२१ : कन्नड अभिनेता पुनीत राजकुमारचे शुक्रवारी सकाळी जिममध्ये व्यायाम करताना ह्रदय विकराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.ज्या नंतर सिनेसृष्टीत शोककळा पसरली.पुनीत राजकुमार ने वयाच्या ४६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.पडद्यावर झळकलेला हा अभिनेता रिल बरोबर रिअल लाइफ मध्ये देखील एक उमदा माणूस होता.
नेत्रदान करण्यात आले….
पुनीत राजकुमारचे शुक्रवारी सकाळी निधन झाले.त्यानंतर त्याचे डोळे बंगळुरू येथील नारायण नेत्रालयात दान करण्यात आले.या आधी २००६ मध्ये पुनीतचे दिवंगत वडील डाॅ राजकुमार यांचेही डोळे दान करण्यात आले होते.पाॅवर स्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुनीत च्या अकाली जाण्याने चित्रपट सृष्टीला एक मोठा धक्का बसला आहे.
दोन फॅन्स ची आत्महत्या,तर दोन जणांचा हार्ट अटॅक ने मृत्यू….
कन्नड सुपरस्टार पुनीत राजकुमारचे  शुक्रवारी सकाळी निधन झाल्यानंतर त्यांच्या चाहत्यांवर दुखाचा डोंगर कोसळला आणि जबर धक्का बसला.ज्यामुळे पुनीत च्या दोन फॅन्सनी आत्महत्या केली आहे.बेळगाव मधील पुनीत च्या एका फॅन ने त्याचा फोटो हार घातला आणि स्वताला गळफास लावून आत्महत्या केली.तर दुसरीकडे पुनीत च्या निधनाची बातमी कळताच दोन जणांना ह्रदय विकराचा तीव्र झटका आला आणि त्यांचे निधन झाल्याते वृत्त समोर आले आहे…..
न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा