मुंबई, २९ ऑगस्ट २०२२ हातोडा मॅन म्हणून ओळखले जाणारे भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी विविध प्रकारचे घोटाळे बाहेर काढून विरोधी पक्षाच्या नेत्यांना पानी पाजले आहे. तर आता त्यांनी आपला मोर्चा मुंबईतील अनाधिकृत गगनचुंबी इमारतींवर वळवला आहे आणि या विषयावर त्यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस यांना पत्र लिहिले आहे. सोमय्या पत्रात बोलतात की नॉएडा मध्ये अनाधिकृत टॉवर्स वर ज्या प्रमाणे कारवाई होते त्याच प्रमाणे मुंबई का होत नाही. काल नोएडा मध्ये अनाधिकृत टॉवर पाडण्यात आले. मुंबईत असे शेकडो अनाधिकृत टॉवर आणि हजारो अनाधिकृत बांधकाम आहेत. त्यामुळे लाखो कुटुंब चिंतेत आहेत. असे मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
मुंबईतही अनेक बिल्डरांकडून इमारतींना OC मिळाले नाहीत यामुळे फ्लॅटधारकाना मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरं जावे लागत आहे. त्यामुळे बिल्डर आणि महापालिकेचे भ्रष्ट अधिकाऱ्यांचे विशेष ऑडिट करण्याची मागणी सोमय्यांनी केली आहे. मुंबईत बनावट प्रमाणपत्र ओसी न मिळालेले शेकडो टॉवर्स आहेत. माझ्या माहितीप्रमाणे २५ हजाराहून अधिक फ्लॅटधारक ओसी न मिळाल्याने चिंतेत आहेत. त्यामुळे २५ हजाराहून अधिक मध्यमवर्गीय रहिवाशी यांची रक्षण करण्याची मागणी आपण शिंदे आणि फडणवीस यांच्याकडे केल्याचे सोमय्या म्हणाले.
किशोरी पेडणेकर यांनी वरळीमध्ये अर्धा डझन अधिक बेनामी गाळ्यांचा ताबा घेतला आहे. या प्रकरणी पुन्हा एकदा मी एसआरए प्राधिकरणात जाऊन कारवाईची मागणी केली असल्याचेही सोमय्यांनी यावेळी सांगितले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: वैभव शिरकुंडे