टर्कीनंतर आता चीन आणि तजाकिस्तानमध्येही भूकंपाचे धक्के

बीजिंग, २३ फेब्रुवारी २०२३ :टर्कीनंतर आता चीन आणि तजाकिस्तानमध्येही भूकंपाचे धक्के बसले आहेत. या भूंकपाची तीव्रता अनुक्रमे ७.३ आणि ६.८ रिश्टर स्केल मोजण्यात आली आहे. यूएस जिऑलिजकल सर्वेनुसार गुरुवारी सकाळच्या सुमारास हे भूकंप झाले.

यूएस जिऑलिजकल डिपार्टमेंटकडून मिळालेल्या माहितीनुसार, तजाकिस्तानमध्येही झालेल्या भूकंपाची तीव्रता ६.८ रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली आहे. याबरोबरच उइगर प्रांतातही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. भूकंपामुळे झालेल्या नुकसानाबद्दल अद्याप माहिती मिळालेली नाहीये.

तर चीनमध्ये गुरुवारी (२३ फेब्रुवारी) सकाळी ८:३७ वाजता शिनजियांगमध्ये ७.३ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. या भूकंपाचे केंद्र चीन सीमेपासून ८२ किमी दूर होते. याबरोबरच उइगर प्रांतातही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. मात्र, चीनमधील परिस्थितीबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती मिळालेली नाही.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा