दोन वर्षांनंतर परदेशी उड्डानांना हिरवा कंदील, 27 मार्चपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणे होणार सुरू

4

नवी दिल्ली, 9 मार्च 2022: कोरोना संकटामुळे गेल्या दोन वर्षांपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र आता 27 मार्चपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू होणार आहेत. सर्व बाबींचा आढावा घेतल्यानंतर सरकारने आंतरराष्ट्रीय व्यावसायिक प्रवासी सेवा पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे.

27 मार्चपासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा पुन्हा सुरू

वास्तविक, कोरोनाची प्रकरणे कमी झाल्यामुळे सरकारने आंतरराष्ट्रीय उड्डाणे पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली आहे. आता 27 मार्चपासून प्रवाशांना परदेशात जाण्यासाठी फ्लाइट सहज मिळणार आहे.

वाढत्या कोरोना प्रकरणाला रोखण्यासाठी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) 23 मार्च 2020 पासून भारतातील आंतरराष्ट्रीय व्यावसायिक प्रवासी विमान कंपन्यांचे ऑपरेशन स्थगित केले होते. पण आता लसीकरण कार्यक्रमात झालेली वाढ आणि कोरोनाच्या घटनांमध्ये घट झाल्यानंतर सरकारने आंतरराष्ट्रीय विमानसेवा पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे.

आंतरराष्ट्रीय विमान प्रवाशांच्या संख्येत वाढ

आता 27 मार्चपासून परदेशात जाण्यासाठी सर्वसामान्यांना हवाई सेवेचा लाभ घेता येणार आहे. भारताने आतापर्यंत अनेक देशांसोबत एअर बबल करारांतर्गत आंतरराष्ट्रीय उड्डाणे चालवण्यास परवानगी दिली होती.

विशेष म्हणजे, नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी गेल्या महिन्यात सांगितले होते की पुढील दोन महिन्यांत विमान वाहतूक कोविडपूर्व पातळीपर्यंत पोहोचण्याची त्यांची अपेक्षा आहे. त्याच वेळी, आंतरराष्ट्रीय विमानसेवा पूर्णपणे पूर्ववत व्हावी यासाठी यामध्ये सहभागी असलेल्या सर्व संबंधितांशी चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा