आगरवाल महाविद्यालयात सावित्रीबाईना अभिवादन

बारामती: येथील राधेश्याम एन आगरवाल महाविद्यालयात आज अनोख्या पद्धतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी इ ९ वी ब मधील कु दिया डेरे या विद्यार्थिनीने सावित्रीबाई यांची वेशभूषा करून ‘मी सावित्रीबाई बोलतेय’ हे एकपात्री नाटक सादर केलं. तर इ ५ वी क मधील विद्यार्थिनींनी बालिका दिनानिमित्त नाटक सादर केल.
याप्रसंगी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर कु. तावरे संजिवनी हिने मनोगत व्यक्त केले. भोसले यु पी यांनी सावित्रीबाई व महात्मा फुले यांच्या जीवनावर माहिती दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य राजेंद्र काकडे होते.
यावेळी विद्यालयातील सर्व महिला शिक्षिका उपस्थित होत्या. मोहिते अर्जुन , विष्णू बाबर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यालयात माता पालक मेळावा देखील आयोजन करण्यात आले होता. यासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन निर्भया पथकाच्या प्रमुख सहाय्यक पोलिस निरीक्षक अमृता भोईटे उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु कीर्ती काळे हिने केले तर परतबराव तावरे यांनी आभार मानले.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा