पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘संभाजी ब्रिगेड’चे आंदोलन

पुणे, २० ऑक्टोबर २०२०: पुणे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या सर्व पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. मागील दोन – तीन वर्षांपासून पावसाचे पर्जन्यमान कमी असल्याने पिकांचे उत्पादन घटले आहे. तसेच बोगस बियाणांमुळे महाराष्ट्रातील शेतकरी त्रस्त होता. त्यातच मागील सात महिन्यापासून कोरोनाच्या प्रभावामुळे शेतमालाला बाजार भाव मिळाला नाही,त्यामुळे शेतकऱ्यांचे हाल झाले.

या हंगामामध्ये पिके चांगली आली होती, परंतु अतिवृष्टीमुळे सर्व पिकांचे नुकसान झाले असल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडून हवालदील झाला आहे. त्यामुळे शासनाने पंचनामे न करता सरकारने हेक्टरी ५०.०००/- (पन्नास हजार रुपये) मदत म्हणून तात्काळ शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करावी. तसेच पिक विमा रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्याचे आदेश पिक विमा कंपन्याना द्यावेत व शेतकऱ्यांना भरघोस मदत करण्यात यावी तरी वरील मागण्या तात्काळ पूर्ण कराव्यात, यासाठी संभाजी ब्रिगेड पुणे जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे आंदोलन करण्यात आले व मागण्यांचे निवेदन उप जिल्हाधिकारी मा. जयश्री कटारे यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे, माजी पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, जिल्हा सचिव निलेश ढगे, जिल्हा कार्याध्यक्ष साजिद सय्यद, उपाध्यक्ष रणजित बिराजदार, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मोहिनी रणदिवे, व्यापारी आघाडी अध्यक्ष विवेक कावरे, मावळ लोकसभा कार्याध्यक्ष दिनकर केदारी, सहसचिव गणेश बोरकर, विद्यार्थी आघाडी कार्याध्यक्ष सुमेध गायकवाड, डी आर गायकवाड, स्वतेज वाघ, साहिल गायकवाड, रोहन खुटवड, करण शिंदे, सुमेध गायकवाड, रेमंड ली, प्रणित चव्हाण, गणेश शिंदे, मोहित दुबे पाटिल, अॅड. संजय वाघमारे, अॅड. विवेक देशपांडे, अॅड. अशोक माने आदी कार्यकर्ते उपस्थीत होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वरी आयवळे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा