गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा वाघोली येथील संतुलन संस्थेच्या वतीने आंदोलन

वाघोली येथील संतुलन संस्थेच्या वतीने आंदोलन

वघोली: आज जागतिक महिला दिना निमित्ताने पुणे जिल्ह्यातील वाघोली येथील संतुलन संस्थेच्या वतीने “कष्टकरी दगडखाण कामगार महिलांनी रडायचं नाही तर आपल्या हक्कसाठी लढायचं झगडायचं” अशा घोषणा देतं आपल्या विविध मागण्यांसाठी पुणे नगर महामार्गावर आंदोलन केले.

या वेळी या कष्टकारी महिलांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी होवून जागतिक महिला दिनाची पगारी सुट्टी जाहिर करावी, अवैध दारूधंदे जुगार मटका अड्डे बंद करावेत, गॅस सिलेंडर च्या वाढीव किंमती रद्द कराव्यात, असंघटित कष्टकरी महिलांसाठी मोफत आरोग्य विमा द्यावा,विधवा महिलांना शासकीय नोकऱ्यामध्ये आरक्षण द्यावे, महिलांसाठी लघु उद्योग महामंडळ निर्माण करावे, शेतकरी कष्टकरी महिलांच्या शेतीमालाला हमीभाव मिळावा अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.

error: Content is protected !!
Exit mobile version