अग्निवीर भरती विशेष रॅलीच्या तारखा जाहीर, पहा झोननिहाय वेळापत्रक

33

पुणे, 2 जुलै 2022: अग्निपथ योजनेअंतर्गत 4 वर्षांच्या सैन्य भरती अंतर्गत अग्निवीर भरती रॅली अधिसूचना जारी करण्यात आलीय. भारतीय लष्कराने वेगवेगळ्या झोनमध्ये होणाऱ्या विशेष भरती रॅलीच्या तारखाही जाहीर केल्या आहेत. नवीन प्रणाली अंतर्गत, सैन्यात सेवा देण्यास इच्छुक तरुण joinindianarmy.nic.in या अधिकृत वेबसाइटवर संपूर्ण माहिती तपासू शकतात.

कुठं भरती मेळावा होणार

अल्मोडा – 20 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट
लँडस्डाउन – 19 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट
पुणे – 23 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर
बंगळुरू – 10 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट
हमीरपूर – 29 ऑगस्ट ते 08 सप्टेंबर
हिस्सार – 12 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट
लुधियाना – 10 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट
त्रिची (पोडिचेरी) – 21 ऑगस्ट ते 01 सप्टेंबर

पगार तसा असेल

अधिसूचनेनुसार, उमेदवारांची भरती 4 वर्षांसाठी केली जाईल. दरवर्षी पगार आणि भत्ते असे असतील. या दरम्यान दरवर्षी 30 दिवसांची रजाही मिळणार आहे.

  • 30,000/- पहिल्या वर्षासाठी पगार आणि भत्ते
  • दुसरे वर्ष 33,000/- पगार आणि भत्ते
  • तिसऱ्या वर्षी पगार आणि भत्ते 36,500/-
  • 40,000/- पगार आणि भत्ते चौथ्या वर्षी दिले जातील पगारातील 30 टक्के रक्कम कापून सेवा निधीत जमा केली जाईल. 4 वर्षांत, अग्निवीर एकूण 10.4 लाखांचा निधी जमा करेल, जो व्याज लागू करून 11.71 लाख होईल. हा निधी आयकरमुक्त असेल जो अग्निवीरांच्या 4 वर्षांच्या सेवेनंतर उपलब्ध होईल.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे