गोल पोस्ट महाराष्ट्र ऐतिहासिक स्मारकांची देखभाल, इंद्राणी बालन फाउंडेशन आणि पुरातत्त्व विभागामध्ये करार

ऐतिहासिक स्मारकांची देखभाल, इंद्राणी बालन फाउंडेशन आणि पुरातत्त्व विभागामध्ये करार

पुणे १८ ऑगस्ट २०२४ : समाजकार्यात नेहमीच अग्रेसर असलेले युवा उद्योजक पुनीत बालन यांनी जिल्ह्यातील ऐतिहासिक स्मारकांची स्वच्छता आणि देखभाल करण्याची जबाबदारी घेतली आहे. इंद्राणी बालन फाउंडेशन आणि राज्य पुरातत्त्व विभाग यांच्यात यासंबंधीचा करार नुकताच झाला.

पुणे जिल्हयातील सिंहगड किल्यावरील छत्रपती राजाराम महाराज समाधी, वढू बुद्रुक येथील स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे समाधी स्थळ, राजगुरुनगर मधील हुतात्मा शिवराम हरी राजगुरुंचे जन्मस्थळ आणि तुळापूर येथील महादेव मंदिर या राज्य संरक्षित स्मारकांचा यामध्ये समावेश आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : शुभम केसकर

error: Content is protected !!
Exit mobile version