सायली मुळे या कृषी कन्येकडून शेतक-यांना कृषीविषय मार्गदर्शन

कर्जत, १८ ऑगस्ट २०२०: कर्जत तालुक्यातील मुळेवाडी या ठिकाणी राहणारी विद्यार्थीनी सायली हेमंत मुळे या कृषी कन्येकडून शेतक-यांना विविध मार्गदर्शनाचे धडे शेती विषय प्रात्यक्षिके देण्यात येत आहेत.

सायली मुळे या कृषी कन्येच्या उपक्रमांची तालुक्यात सगळीकडे चर्चा आणि कौतुक केले जातं आहे. सध्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र आर्थिक संकट निर्माण झालेले आहे.याच पार्श्वभूमीवर शेतकरी देखील संकटात आलेला असताना,कर्जत तालुक्यात मुळेवाडी येथील सायली हेमंत मुळे ही विद्यार्थिनी लोणी येथील कृषी महाविद्यालयातील शेवटच्या वर्षात शिक्षण घेत आहे. या विद्यार्थीनीने परिसरातील शेतक-यांसाठी कार्य शाळा उगडली आहे.

शेतक-यांना पिकांवरील किड आणि रोगाचा प्रादुर्भाव याच प्रमाणे पशु धनासाठी किंवा गाय जनावरांसाठी लसीकरण यासह विविध माहिती देऊन त्यांचे प्रात्यक्षिक देखील दाखवत आहे. या उपक्रमासाठी महाविद्यालयांचे प्राचार्य निलेश दळे, प्रा.रमेश जाधव, अमोल खडके, डाॅ.दिपाली तांबे, यांचे मार्गदर्शन तीला लाभले आहे. या उपक्रमांमुळे या कृषी कन्येवर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा