कृषी विधेयक २०२० प्रबोधन रथाचे आज उद्घाटन पार पडले .

पुणे , २६ ऑक्टोबर २०२० :शेतकऱ्यांचेे उत्पन्न दुप्पट करण्याच्या हेतूने मोदी सरकारने नुकताच आणलेला कृषी विधेयक कायदा हा शेतकऱ्यांच्या प्रगतीच्या दृष्टीने त्यांच्या भवितव्यासाठी फार मोठे पाऊल आहे.

या कायद्याचे वास्तव सामान्य लोकांपर्यंत पोहचवण्याचे आवाहन चंद्रकात पाटील यांनी केले होते. आवाहनाला अनुसरून नारायण पेठेतील भाजपाचे कार्यकर्ते श्री योगेश शांडिल्य-तिवारी यांनी ‘कृषी विधेयक २०२० प्रबोधन रथाची संकल्पना प्रत्यक्षात अंमलात आणली. ज्याचे उद्घाटन चंद्रकांत पाटील यांचा हस्ते झाले.

या प्रसंगी प्रदेश भाजपाचे सदस्य श्री शेखरजी मुंदडा, प्रदेश युवा मोर्चाचे सरचिटणीस नगरसेवक श्री सुशीलजी मेंगडे, कोथरूड मंडलाचे अध्यक्ष श्री पुनीतजी जोशी, कसबा मंडलाचे उपाध्यक्ष श्री विजयजी गायकवाड, पुणे युवा मोर्चा सरचिटणीस अभिजीत राऊत आदी मान्यवर व सहकारी उपस्थित होते.


न्यूज अनकट प्रतिनिधी : ज्ञानेश्वरी आयवळे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा