शेतकऱ्यांच्या आत्महत्यावर कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचे बेताल व्यक्तव्य

छत्रपती संभाजीनगर, १३ मार्च २०२३ : अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हाततोंडाशी आलेल्या घास हिरावून घेतला गेला. त्यातच शेतकऱ्यांचा मालाला भाव मिळत नसल्याने मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांबद्दल राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तर यांनी बेताल व्यक्तव्य केले आहे. छत्रपती संभाजीनगर येथे गेल्या आठवड्यात सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. यातील तीन शेतकरी हे खुद्द कृषिमंत्री यांच्या मतदारसंघातील होते. याच प्रश्नावर कृषिमंत्र्यांना छत्रपती संभाजीनगर येथे माध्यम प्रतिनिधींनी प्रश्न विचारले असता, कृषिमंत्र्यांनी ‘शेतकरी आत्महत्या’ हा काही आजचा विषय नाही. अनेक वर्षांपासून शेतकरी हे आत्महत्या करतात. अशाप्रकारे बेताल व्यक्तव्य करण्यात आले आहे. यापुढे बोलताना म्हणाले की, माझ्या मतदारसंघात फिरून आलो. मी स्वतः सोयगावला जाऊन आलो. शेतीचं फार काही मोठं नुकसान झालं नाही; परंतु जे नुकसान झाले त्याचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करणार आहोत.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : विनोद धनले

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा