अवघ्या २ तासांत वाचली कृषिमंत्र्यांची खुर्ची; नेमक प्रकरण काय जाणून घ्या.

42
Manikrao Kokate Agriculture Minister Court Roiling Maharashtra Government Legal News
अवघ्या २ तासांत वाचली कृषिमंत्र्यांची खुर्ची; नेमक प्रकरण काय जाणून घ्या.

नाशिक २० फेब्रुवारी २०२५ : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार तसेच राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचा भाऊ सुनील कोकाटे यांच्या विरोधात मुख्यमंत्री कोट्यातून बनावट कागदपत्रांची फेरफार केल्याप्रकरणी नाशिक जिल्हा न्यायालयाने प्रत्येकी दोन वर्षाची आणि ५० हजार रुपये दंड भरण्याची शिक्षा ठोठावली होती. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात ठिणगी उडाली असून यामुळे माणिकराव कोकाटे यांची आमदारकी आणि मंत्रिपद धोक्यात आले आहे. मात्र आता अवघ्या दोन तासांत त्यांना जमीन मंजूर झाला आहे.

माहितीनुसार, माणिकराव कोकाटे यांना शिक्षा झाल्यावर त्यांनी लगेचच नाशिक जिल्हा न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. यावर अवघ्या २ तासांत सुनावणी झाली. या सुनावणीत अजित पवार गटचे आमदार आणि कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना जमीन मंजूर झाला आहे. त्यांना १५ हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर हा जामीन मंजूर झाला असून पुढे त्यांना सत्र न्यायलयात अपील करण्यासाठी ३० दिवसांची मुदत दिली आहे.

नेमके प्रकरण काय जाणून घ्या :

शासनाकडून ज्या सदनिका दिल्या जातता ते माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधु सुनील कोकाटे यांना मिळाल्या होत्या. परंतु त्यांनी त्यावेळी आमचे उत्पन्न कमी असून आम्हाला दुसरे घर नाही अशी माहिती शासनाला दिली होती. पण अधिकाऱ्यांनी या संदर्भात नाशिकच्या सरकारवाडा पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. आता या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात अजून चार जणांचा समावेश असल्याने त्या चार आरोपींना सुद्धा अटक करण्यात आली आहे.

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि भाऊ सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने २ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी त्यांच्या विरोधात याचिका दाखल केली होती. या याचिकेत त्यांनी १९९५ साली मुख्यमंत्री कोट्यातून कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप केला होता. कृषिमंत्री यांच्यावर ४२०,४६५,४७१ आणि ४७अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला होता.

न्यूज अनकट प्रतिनिधी, प्रथमेश पाटणकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा