गोल पोस्ट राष्ट्रीय अहमदनगर जिल्ह्यातील जवानाला वीरमरण

अहमदनगर जिल्ह्यातील जवानाला वीरमरण

जम्मू काश्मीर: येथील नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानी लष्कराशी लढताना नगर जिल्ह्यातील दहीगाव बोलका येथील जवान शहीद झाले आहेत. नायब सुभेदार सुनील रावसाहेब वलटे (वय ३८) असे शहीद झालेल्या जवानांचे नाव आहे. त्यांच्या मागे पत्नी, आई वडील, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.
वलटे हे “मराठा रेजिमेंट २४ बटालियन” मध्ये ते कार्यरत होते. वलटे यांचे पार्थिव आज सायंकाळपर्यत पुण्यात आणण्याची दाट शक्यता आहे. त्यांच्या जाण्याने संपूर्ण नगर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version