पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी भारतीयांच्या व्हिसासाठी अमेरिकन संसदेत चर्चा

4

अमेरिका, ८ जून २०२३ : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काही दिवसांसाठी अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. यापूर्वीच भारतीयांच्या व्हिसासंदर्भातील अमेरिकेच्या संसदेत प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीयांची व्हिसा व्यवस्था सुरळीत करण्यासाठी आम्ही काय करत आहोत ? असा सवाल देखील तेथील एका खासदारकडून अमेरिकेतील संसदेत विचारण्यात आला आहे.

यूएस सिनेट फॉरेन रिलेशन्स कमिटीचे अध्यक्ष सिनेटर बॉब मेनेडेझ आणि इंडिया कॉकसचे उपाध्यक्ष मायकेल वॉल्ट्ज यांनी भारतीयांना यूएस व्हिसा मिळण्यात होणाऱ्या विलंबावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यावेळी संसदेत बोलताना मेनेडेझ म्हणाले की, अमेरिकन लोकांचे भारतीयांशी चांगले संबंध आहेत. भारत आता क्वाडचा एक भाग आहे आणि आम्ही भारतासोबतचे आमचे संबंध सतत मजबूत करत आहोत.

जगभरातील इतर देशांच्या तुलनेत अमेरिकन व्हिसा मिळवण्यासाठी लागणारा वेळ हा सर्वाधिक आहे. अमेरिकेच्या B1-B2 व्हिसासाठी अर्ज करणाऱ्या भारतीयांना सुमारे ४५० ते ६०० दिवस वाट पाहावी लागते. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिका दौऱ्यावर जाण्याच्या आधीच अमेरिकेच्या संसदेत चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा