‘जनाधूनं विचार मंच’तर्फे अहिराणी दिनदर्शिका प्रकाशित

4

औरंगाबाद, ३१ डिसेंबर २०२२ : येथील खानदेश क्लब ‘जनाधूनं विचार मंच’तर्फे नुकतीच अहिराणी दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली. यावेळी ‘जनाधूनं विचार मंच’चे अध्यक्ष श्री. विनायक पवार यांनी खानदेश अहिराणी दिनदर्शिकेची सविस्तर माहिती देताना सांगितले, की दिनचर्या, ऋतुचर्या, विशेषत: खानदेशमधील सणांचे महत्त्व व इतर माहिती या दिनदर्शिकेमध्ये दिली आहे. यावेळी औरंगाबादमधील सर्व खानदेशी बंधूंच्या घरी दिनदर्शिका पोचविण्याचा संकल्प कार्यकारिणीने केला आहे.

या कार्यक्रमाप्रसंगी आंतरराष्ट्रीय फोटोग्राफर श्री. बैजू पाटील, अर्जुन गायके, मिलिंद पाटील, प्रदिप पाटील, लेफ्टनंट जितेंद्र देसले, पराग भामरे, दीपक चव्हाण, नीलेश देसले, मधुकर गौड, नितीन पाटील, संदीप भदाणे व इतर मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमानंतर उपस्थितांना भोजनासाठी खानदेशातील प्रसिद्ध भरीत-भाकरी, ठेचा, पापड असा मेनू ठेवण्यात आला होता. तरी जेवणाच्या व्यवस्थेत अतिशय सुसूत्रता दिसून आली. उत्तम उदाहरण या ठिकाणी घालून दिले. अतिशय व्यवस्थितरीत्या आपल्या पोटाची भूक भागविण्यासाठी जितक्या अन्नाची गरज आहे तितकेच अन्न प्रत्येकाने आपल्या ताटात घेतले. ताटात उष्टे पडणार नाही, याची पुरेपूर काळजी सर्वांनी घेतली.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा