अहमदनगर : ऑल इंडिया बँक रिटायरीज फेडरेशनच्या वतीने प्रोफेसर कॉलनी चौक येथे विविध मागण्यांसाठी निदर्शने करण्यात आली.
या निदर्शनातुन ज्येष्ठ नागरिकांच्या बँक ठेवींना विमा संरक्षण देण्यात यावे, बँक ठेवीवर किमान ९ टक्के व्याजदर द्यावा,
कमाल मर्यादा काढून टाकावी, आरोग्य विमा हप्त्यावर जीएसटी आकरण्यात येऊ नये.
तसेच ९० वर्षांपुढील निवृत्तांना १० हजार रुपयांपर्यंत वृद्धी करावी. निवृत्ती वेतन धारकांना रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार वाढ करावी.
गेल्या २५ वर्षांपासून पेन्शन वाढलेली नाही. दरम्यान भारताचे उत्पन्न हे चार पटीने वाढलेले आहे. सर्वच बँक सेवानिवृत्त कर्मचार्यांचे निवृत्ती वेतन हे रिझर्व्ह बँकेच्या निवृत्ती वेतन योजनेनुसार वाढविण्यात यावे.
याबाबत इंडियन बँक असोसिएशनने निवृत्तांच्या संघटना सोबत त्यांच्या मागण्यांविषयी प्रत्यक्ष बोलणी करावी.
या निदर्शनात डिस्ट्रिक्ट कमिटीचे चेअरमन उमाकांत कुलकर्णी, कॉ.माणिक आडाणे, कॉ.अशोक बडवे, कॉ.वहाडणे, कॉ.जयंत वेसीकर, कॉ.जयंत धर्माधिकारी, कॉ.नंदलाल जोशी, कॉ.ओजळे, कॉ.अच्युत पटवर्धन, कॉ.शिरिष उदास, कॉ.व्ही.एन.जोशी उपस्थित होते.