नवी दिल्ली, २३ सप्टेंबर २०२० : २०२३ पर्यंत रेल्वेने ब्रॉडगेज मार्गांचे १००% विद्युतीकरण पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. याबाबत रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात हे सांगितले.
यावर्षी १ एप्रिल रोजी एकूण ६३ हजार ६३१ मार्ग किलोमीटर पैकी सुमारे ६३ टक्के ब्रॉडगेज लाईनचे विद्युतीकरण करण्यात आले आहे, अशी माहिती मंत्र्यांनी दिली. ते म्हणाले, देशात एकूण २३ हजार ७६५ मार्ग किलोमीटर मार्गाचे विद्युतीकरण होणे बाकी आहे.
दुसर्या एका प्रश्नात श्री. गोयल म्हणाले, रेल्वेच्या रिकाम्या जागेची तात्काळ परिचालन गरजांसाठी आवश्यक नसलेली अंतरिम कालावधीमध्ये अतिरिक्त आर्थिक संसाधने एकत्रित करण्यासाठी व्यावसायिक विकासासाठी वापरली जाते. ते म्हणाले, स्टेशन पुनर्विकासाची योजना खासगी सहभागाला निमंत्रण देऊन स्थानकात आणि त्याच्या आसपासच्या जमीन व हायवेच्या जागांच्या रीअल इस्टेट संभाव्यतेचा लाभ देऊन बनविली जाते
न्यूज अनकट प्रतिनिधी