एअर इंडियाच्या विमानाला हवेतच लागली आग; अबूधाबीमध्ये केले इमर्जन्सी लँडिंग

अबू धाबी, ३ फेब्रुवारी २०२३ :अबू धाबी येथे एअर इंडिया विमानाच्या इंजिनला हवेतच आग लागल्याची घटना शुक्रवारी घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अबू धाबी येथून कलिकट येथे येण्यासाठी या विमानाने उड्डाण केले होते. पण उड्डाण केल्यानंतर हवेत फक्त १ हजार फूट उंचीवर गेल्यानंतर विमानाच्या इंजिनला आग लागली. त्यानंतर विमानाचे अबू धाबी विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.

डीजीसीएकडून मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडियाच्या B737-800 VT-AYC ऑपरेटिंग फ्लाइट IX 348 च्या एक नंबरच्या इंजिनला आग लागली. आग लागली त्यावेळी विमान हवेत जवळपास १ हजार फूट उंचीवर होते. पण त्यानंतर पायलटने प्रसंगावधान राखत इमर्जन्सी लँडिंग केले. या विमानातून १८४ प्रवासी प्रवास करत होते. ते सर्व प्रवाशी सुखरुप आहेत. दरम्यान, डीजीसीएने या प्रकरणी तपास करण्याचे आदेश दिले आहेत.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा