एअर इंडियाच्या विमानाला केरळात अपघात; विमानाचे झाले दोन तुकडे

केरळ, दि. ७ ऑगस्ट २०२०: एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाल्याचे वृत्त समोर आले आहे. केरळच्या कोळीकोडमध्ये एअर इंडिच्या विमानाला अपघात झाला आहे. एअर इंडिया एक्स्प्रेसचे हे विमान होते. रनवे वरती विमान लँड करत असताना विमान रनवे सोडून पुढे गेल्यामुळे हा अपघात झाला आहे. याबाबत स्पष्टीकरण केरळचे कॅबिनेट मंत्री के राज यांनी दिले आहे.
एअर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, एअर इंडियाचे हे विमान दुबईवरून केरळमध्ये आले होते. या विमानांमध्ये तब्बल १९१ प्रवासी होते. बोईंग ७३७ प्रकारचे हे विमान करुपूर धावपट्टीवर संध्याकाळी ७ वाजून ४१ मिनिटांनी लॅंड करत होते. त्यावेळी हे विमान धावपट्टीवरून घसरले.     

हा अपघात होताच घटनास्थळाकडे तातडीने चोवीस रुग्णवाहिका रवाना झाल्या. तसेच अग्निशामक दल देखील बचाव कार्य करण्यासाठी अपघातस्थळी पोहोचले आहे. विमानाचा अपघात झाला आहे परंतु, अपघातांमध्ये विमानाने पेट घेतलेला नाही. विमानाचे दोन तुकडे झाले आहेत. या अपघातामध्ये विमानाचा पायलट मृत्युमुखी पडला आहे. इतरही जीवित हानी झाल्याची शक्यता आहे.      

एअर इंडियाने एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार विमानात १७४ प्रवासी होते आणि ६ क्रू मेंबर्स होते, ज्यात दोन पायलट्सचाही समावेश होतो. DGCA ने दिलेल्या माहितीनुसार करीपूर विमानतळाच्या रनवे नंबर १० वर उतरताना हे विमान घसरले आणि याचे दोन तुकडे झाले.

याबाबत प्रशासनाने हेल्पलाईन जाहीर केली आहे.
०५६५४६३९०३/०५४३०९०५७२

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा