नवी दिल्ली : जर तुम्ही एअरटेल किंवा जिओचे सिमकार्ड वापरत असाल तर तुमच्यासाठी मोठी बातमी आहे. आता तुमच्याकडे मोबाईल नेटवर्क नसेल तरीही तुम्ही अगदी आरामशीर फोनवर बोलू शकणार आहात.
एअरटेल आणि जिओ कंपनीने आपली ‘व्हिओ वायफाय’ म्हणजेच व्हायस ओव्हर वायफाय स्व्हिहस सुरू केलेली आहे. आतापर्यंत ४जी ग्राहक व्हिओ एलटीई म्हणजेच व्हाईस ओव्हर एलटीईच्या माध्यमातून कॉलिंग करत होते.
‘व्हिओ वायफाय’म्हणजे नेटवर्क नसताना कशा पद्धतीने कॉल करता येतो, याला ‘व्हाईस ओव्हर आयपी’देखील म्हटले जाते. याची माहिती पुढीलप्रमाणे देता येईल. ‘व्हिओ वायफाय’च्या माध्यमातून तुम्ही होम वायफाय, पब्लिक वायफाय आणि वायफाय हॉटस्पॉटच्या मदतीने कॉलिंग करता येणार आहे.
उदाहरणार्थ जर आपल्याकडे मोबाईल नेटवर्क नसेल तरीही आपण कोणत्याही वायफाय किंवा हॉटस्पॉट घेऊन आरामशीर बोलू शकणार आहात. ‘व्हिओ वायफाय’चा सर्वात मोठा फायदा रोमिंगमध्ये होत असतो. आपण कोणत्याही ‘वायफाय’च्या माध्यमातून मोफत बोलू शकता. हा खूप मोठा फायदा आहे.