गोल पोस्ट स्पॉटलाइट सिनेमा अजय देवगणच्या “भुज” चित्रपटाची प्रेक्षकांची प्रतीक्षा

अजय देवगणच्या “भुज” चित्रपटाची प्रेक्षकांची प्रतीक्षा

मुंबई: अजय देवगची मुख्य भूमिका असलेला भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. १९७१च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित असून अजय देवगण भारतीय वायुसेनेतील विंग कमांडर विजय कर्णिकची भूमिका साकारत आहे. युद्धात कर्णिक भुजच्या एअरबेसचा प्रभारी होता आणि पाकिस्तानी बाँबस्फोट असूनही एअरबेस चालू ठेवत असे.

अजय देवगण प्रथमच एअरफोर्स ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक अभिषेक दुधय्या यांनी अजयचा पहिला लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. पहिला लुक जाहीर करताना त्यांनी लिहिले की, “माझ्या ‘भुज दि प्राईड ऑफ इंडिया’ चित्रपटातून स्क्वॉड्रॉन लीडर विजय कर्णिक म्हणून अजय देवगण सरांचा पहिला लुक सामायिक केल्याने मला आनंद झाला.”

तसे, अजय देवगनला स्वत: च्या व्यक्तिरेखेमध्ये पाहून विजय कर्णिकही खूप उत्साही आहे आणि अजय या पात्राला न्याय मिळवून देऊ शकेल अशी त्यांची आशा आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version