गोल पोस्ट स्पॉटलाइट सिनेमा अजय देवगणचा तानाजी येणार मराठीतही

अजय देवगणचा तानाजी येणार मराठीतही

मुंबई : याआधी अनेकदा हिंदी चित्रपट मराठी भाषेत डब करण्यावर राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्षेप घेतला आहे.
पण जगभरातील अनेक भाषांमध्ये ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ हा हिंदी भाषेतील ऍक्शनपट डब व्हावा, अशी इच्छा महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेने व्यक्त केली आहे.
मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्विटरद्वारे यासंदर्भातील माहिती दिली आहे.
अजय देवगणने याच ट्विटला उत्तर देत म्हंटले, आमचा ‘तान्हाजी’ हा चित्रपट हिंदी व मराठी भाषेत रिलीज करण्यासाठी परवानगी दिल्याबद्दल अमेय आणि मनसेचे मी आभार मानतो. त्यामुळे अजय देवगणचा तानाजी आता मराठीतही झळकणार आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version