भारत-चीन गलवान व्हॅली संघर्षावर अजय देवगण बनवणार चित्रपट

4

मुंबई,०४ जुलै २०२०: गलवान व्हॅलीमध्ये भारतीय सैन्य आणि चीनी सैन्य यांच्यात समोरासमोर झालेल्या हिंसक झडपेवर बॉलिवूड अभिनेता अजय देवगण याने चित्रपट बनविण्याची तयारी सुरू केली आहे.

या संघर्षाची कहाणी मोठ्या पडद्यावर आणण्याच्या तयारीत असल्याचे अजय देवगण याने घोषणा केली. या नवीन प्रकल्पाची बातमी चित्रपट समीक्षक व व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी शनिवारी आपल्या इंस्टाग्राम हँडलवर शेअर केली. तथापि, अद्याप या सिनेमाच्या कास्टिंगची अंतिम माहिती देण्यात आलेली नाही.

ऑफिशियल गलवान खो-यातील संघर्षावरील चित्रपट बनवण्यासाठी अजय देवगण यांनी अद्याप चित्रपटाचे शीर्षक ठरवले नाही .यामध्ये चिनी सैन्याबरोबर लढा देणाऱ्या भारतीय सैन्यदलांच्या २० भारतीय सैनिकांच्या बलिदानाची कहाणी सांगण्यात येणार आहे. या चित्रपटासाठी अजून कोणीही कलाकार निश्चित झालेला नाही.

अजय देवगण एफ फिल्म्स आणि सिलेक्ट मीडिया होल्डिंग्ज एलएलपी या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत, “असे त्यांनी आपल्या पोस्ट मध्ये लिहले आहे. १५-१६ जून रोजी झालेल्या हिंसक झडपेत भारतीय सैनिकांना वीरमरण आले होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा