मुंबई, ४ जुलै २०२० : अभिनेता अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला “मैदान” हा चित्रपट पुढच्या वर्षी १३ ऑगस्टला थिएटरमध्ये झळकणार आहे.
भारतीय फुटबॉलच्या सुवर्ण वर्षांवर आधारित, “मैदान” हा चित्रपट सुरुवातीला २७ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार होता, परंतु या वर्षाच्या सुरुवातीला निर्मात्यांनी हा चित्रपट ११ डिसेंबरपर्यंत ढकलला. चित्रपटाच्या नवीन रिलीज तारखेची घोषणा करण्यासाठी अजय देवगणने शनिवारी आपल्या एका ट्विटरवर सांगितले. २०२१ चे दुस-या आठवडयात प्रदर्शित होणा-या या चित्रपटाचा प्रत्येक भारतीयांना अभिमान वाटेल अशी याची कथा आहे. ” मैदान ” या चित्रपटाची तारिख हि १३ ऑगस्ट असेल असे त्याने चित्रपटाच्या पोस्टरच्या बाजूने लिहिले.
सध्या सुरू असलेल्या कोरोना व्हायरसच्या साथीमुळे सर्वत्र पसरलेल्या या आजारामुळे या चित्रपटाच्या शूटिंगवर परिणाम झाला आहे आणि पावसाळ्यानंतर याची सुरूवात होण्याची शक्यता आहे. “मैदान” मध्ये ५१ वर्षीय अभिनेता सय्यद अब्दुल रहीमची भूमिका अजय साकारणार आहे. १९५० पासून ते १९६३ पर्यंत निधन होईपर्यंत भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक आणि व्यवस्थापक म्हणून त्यांनी काम केले होते.
या चित्रपटाचे दिग्दर्शन अमित रविंदर नाथ शर्मा यांनी केले आहे तर सायविन क्वाड्रोजने पटकथा लिहिली आहे, तर रितेश शहा यांनी संवाद लिहिले आहेत. तसेच प्रियामणि, गजराज राव आणि बंगाली अभिनेता रुद्रनील घोष यांच्या मुख्य भूमिका असलेल्या “मैदान” हा झी स्टुडिओ आणि बोनी कपूर यांनी सादर केला आहे. बोनी कपूर ,आकाश चावला आणि अरुणावा जॉय सेनगुप्ता यांच्यासह निर्माता म्हणून काम करत आहे.
अजय देवगणने नुकताच आपला “भुज: द प्राइड ऑफ इंडिया” हा चित्रपट जाहीर केला आहे. डिस्ने+ , हॉटस्टार स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर तो थेट रिलीज होणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी