महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतनश्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजयकुमार गुजर यांनी एसटी संपातून घेतली माघार

मुंबई, 21 डिसेंबर 2021: गेल्या 54 दिवसांपासून महाराष्ट्रात एसटी कामगारांचा संप सुरु आहे. एसटी महामंडळाचं राज्य शासनात विलीनीकरण व्हावं, या मागणीसाठी कर्मचारी अडून बसले होते. 54 दिवसांपासून सुरु असलेल्या एसटी कर्मचारी आंदोलनात आता उभी फूट पडल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतनश्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजयकुमार गुजर यांनी एसटी संपातून माघार घेतली आहे.

काल परिवहन मंत्री अनिल परब आणि अजयकुमार गुजर यांच्यात प्रदिर्घ चर्चा झाली. त्यानंतर अजयकुमार गुजर यांनी आपण संप मागे घेतल्याचं जाहीर केलं. ‘आम्ही संप पुकारला होता. तो आज झालेल्या बैठकीनंतर आम्ही मागे घेत आहोत. एसटी कर्मचाऱ्यांनी विलिनीकरणाचा लढा न्यायालयावर सोपवलेला आहे. न्यायालयाचा निर्णय आम्हाला मान्य असेल. राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन करतो की, सर्व कर्मचाऱ्यांनी आपण पुकारलेला लढा चर्चा केल्याप्रमाणे आता थांबवत आहोत. 22 डिसेंबरपर्यंत तुम्ही कामावर हजर व्हा. आपल्यावरील कारवाई मागे घेण्याची विनंती आम्ही केली आहे’, असं अजय गुजर यांनी सांगितलं.

’22 जानेवारीपर्यंत कामावर हजर राहा’

21 ऑक्टोबर रोजी संघटनेनं दिलेल्या नोटीसनुसार 3 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून संप पुकारला होता. 54 दिवस संप सुरु होता. 2 ते 3 वेळा परिवहन मंत्र्यांसोबत बैठका झाल्या. काल शरद हवार यांच्यासोबत नवी दिल्लीत प्रदीर्घ चर्चा झाली. तेव्हा विलिनीकरणाचा मुद्दा मान्य करण्याचं त्यांनी ठरवलं. विलिनीकरण ही आमची प्रमुख मागणी आहे. आम्ही त्यावर ठाम आहोत. मात्र, गेल्या दीड महिन्यांपासून सुरु असलेला लढा न्यायालयात प्रलंबित आहे. 20 जानेवारी 2022 ही समितीची मुदत तारीख आहे. न्यायालयात आज प्राथमिक अहवाल सादर झालाय. 22 जानेवारीला पूर्ण अहवाल येईल. आज आम्ही मंत्र्यांची भेट मागितली, त्यानुसार दुपारी 2 वाजेपासून चर्चा झाली. विलिनीकरणाबाबत न्यायालय जो निर्णय घेईल तो आम्हा दोघांना मान्य असेल, असं अजय गुजर माध्यमांशी बोलताना म्हणाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा