अजय-रोहितचा पाचवा गोलमाल लवकरच

मुंबई : निर्माता, दिग्दर्शक रोहित शेट्टी, अभिनेता अजय देवगनसोबत पुन्हा एकदा ‘गोलमाल’ या चित्रपटाचा पाचवा भाग प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. ‘गोलमाल५’ चित्रपटाला पुढील वर्षी सुरुवात होईल.
रोहित शेट्टीने केलेल्या गोलमाल या चित्रपटाच्या चारही भागांची मालिका सुपरहिट ठरली होती. विशेष म्हणजे या चारही भागांमध्ये अभिनेता अजय देवगणने मुख्य भूमिका निभावली होती.
अजय देवगण, अर्शद वारसी, तुषार कपूर, श्रेयस तळपदे, कुणाल खेमु आतापर्यंत सर्व गोलमाल सिरीज मध्ये होते पण कदाचित कथानकाच्या मागणीनुसार यावेळी वेगळे कलाकार या चित्रपटात असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुख्य भूमिकेत कोणती अभिनेत्री असेन हे मात्र पुढील वर्षी ठरवण्यात येईल.
दरम्यान, रोहित शेट्टी सध्या सूर्यवंशी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, कतरिना कैफ मुख्य भूमिकेत असून चित्रपट 2020 मध्ये रिलीज होणार आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा