पुणे, ४ ऑक्टोंबर २०२३ : सुरुवातीच्या क्वार्टरमध्येच तीन गोल केल्यानंतर भारतीय पुरुष हॉकी संघाने, कोरियन प्रतिआक्रमणाचा धैर्याने सामना करत आशियाई क्रीडा २०२३ च्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
भारतीय हॉकी संघ शेवटचा २०१४ इंचॉन गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकून थेट ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला होता. २०१८ मध्ये जकार्ता येथे गेल्या वेळी भारतीय संघाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते.
भारताकडून हार्दिक सिंग (५ मिनिट), मनदीप सिंग (११ मिनिट) आणि ललित उपाध्याय (१५मिनिट) यांनी पहिल्या क्वार्टरमध्येच तीन गोल केले. दुसऱ्या क्वार्टरमध्ये कोरियाच्या माने जुंगने १७व्या आणि २०व्या मिनिटाला दोन गोल करत भारतीय कॅम्पमध्ये खळबळ उडवून दिली.
२४व्या मिनिटाला अमित रोहिदासने गोल केल्याने भारतीयांनी पलटवार करत आघाडी घेतली. दरम्यान, ४७व्या मिनिटाल जंगने पुन्हा कोरियासाठी गोल केला. उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेल्या अभिषेकने ५४व्या मिनिटाला गोल करत भारताच्य विजयावर शिक्कामोर्तब केले. आता ७ ऑक्टोबरला होणाऱ्या अंतिम फेरीत भारताचा सामना चीन किंवा जपानशी होणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड