अजित पवार आणि फडणवीस यांना एकाच वेळी कोरणा आणि आता डिस्चार्जही एकत्रच..?

मुंबई, १ नोव्हेंबर २०२०: राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या अनोख्या कनेक्शनची गमतीशीर चर्चा रंगली आहे. याचं कारण असं आहे की, देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांनाही कोरोनाची लागण झाली आहे. अजित पवारांनी अतिवृष्टीचा आढावा घेण्यासाठी राज्यभर दौरा केला होता. त्यानंतर त्यांना कोरोना ची लागण झाली होती. तसेच देवेंद्र फडणवीस यांनादेखील कोरोना ची लागण झाली आहे आणि दोघेही रुग्णालयात उपचार घेत आहेत. सध्या दोघांचीही प्रकृती सुधारली असून आता लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज देखील मिळणार आहे. पण, यंदा रुग्णालयातून डिस्चार्ज ही दोघांना सोबतच मिळणार की काय ही चर्चा सुरू झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रूग्णालयात उपचार घेतल्यानंतर आता अजित पवार यांची प्रकृती सुधारली आहे. तसच लवकरच त्यांना डिस्चार्ज देखील देण्यात येणार आहे. याच बरोबर देवेंद्र फडणवीस यांच्या प्रकृतीत देखील बरीच सुधारणा झाली आहे. त्यामुळं फडणवीस यांना रविवारी (आज) रुग्णालयातून घरी सोडलं जाऊ शकतं. त्यामुळं आता हे जवळपास एकाचवेळी रुग्णालयात दाखल झालेले हे दोन्ही नेते एकत्रच रुग्णालयातून घरी जाण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस हे सेंट जॉर्ज या सरकारी रुग्णालयात दाखल झाले होते. तर अजित पवार यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोघांमधील कनेक्शन विशेष करून मागच्या विधानसभा निवडणुकीनंतर चर्चेत राहिलं आहे. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांना धक्का देत अचानक सरकार स्थापन केलं होतं. मात्र, हे सरकार एक दिवसही टिकू शकलं नाही. अजित पवार यांनी पलटी मारत पुन्हा शरद पवार यांना घेऊन मिळाले आणि राज्यात आघाडी सरकार स्थापन केलं. यानंतर मात्र देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांवर अनेक गमतीशीर मेसेज देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा