पुण्याचं लॉकडाऊन हटवण्यास झाली होती घाई, अजित पवारांची कबुली

पुणे, ६ सप्टेंबर २०२०: सध्या देशामध्ये कोरोनाबाबत सर्वात गंभीर स्थिती पुणे शहरामध्ये दिसत आहे. मुंबईलाही मागे टाकत आता पुणे भारतातील कोरोनाच्या बाबतीत हॉटस्पॉट ठरलं आहे. २५ मार्च पासून पूर्ण देशामध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आलं होतं. त्यानंतर सगळेच उद्योग धंदे व रोजगार बंद झाले होते. यासाठीच पुण्यातील व्यापारी वर्ग आणि कर्मचाऱ्यांच्या संघटना अशा विविध घटकांकडून टाळेबंदी उठवण्याची मागणी होत होती. याच मागणीला अनुसरून पुण्यातील लॉकडाऊन हटवण्यात आलं होतं. पुण्याचे लॉकडाऊन हटवण्यामध्ये थोडी घाई झाली असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मान्य केलं आहे.
     

पुण्यातील कोरोनाबाबतची होत चाललेली गंभीर स्थिती पाहता पुण्यात शनिवारी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. या बैठकीत उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह अनेक मंत्री आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
   

या बैठकीनंतर झालेल्या पत्रकर परिषदेत त्यांनी पुण्यातील रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पुण्यात टाळेबंदी उठवण्याबाबत घाई झाल्याची कबुली दिली. व्यापारी वर्ग आणि कर्मचारी संघटनांच्या मागणीनुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

काहीना मास्कची गरज वाटत नाही

कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र, अनेक ठिकाणी नागरिक मास्क वापरताना दिसत नाही. फिजिकल डिस्टंन्स पळताना दिसत नाही. तर काहींना वाटते की, मास्कची गरज नाही, असे निरिक्षण नोंदवताना प्रत्येकाने मास्कचा वापर करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. तसेच मास्क न घालणाऱ्या आणि कुठेही थुंकणार्‍यावर कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा