शिंदे फडणवीस सरकारवर अजित पवारांचे ताशेरे …

2

मुंबई, २९ जुलै, २०२२: विरोधी पक्षनेते म्हणून अजित पवारांनी जोरदार पावलं उचलली आहेत. सध्या ते पूरग्रस्त दौ-यावर असून आज त्यांचा दौ-याचा दुसरा दिवस आहे. विदर्भ, चंद्रपूर, या ठिकाणी सध्या पूरस्थिती आहे. सध्या ते शेतक-यांचे प्रश्न आणि त्यासंबधीची पाहणी करत आहे. पण आता ते अँक्शन मोडमध्ये आले असून त्यांनी आता शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरले आहे.

राज्यात अजूनही पाऊस पडत आहे. पण शिंदे- सरकार मात्र अजूनही उंटावरुन शेळ्या हाकत आहेत. त्यांचे शेतक-यांच्या प्रश्नांकडे लक्ष नाही. आता तरी त्यांनी या प्रकरणी लक्ष घालावे, असे मत अजित पवारांनी व्यक्त केले. अजूनही परिस्थिती सुधारली नाही, शेतक-यांचे पंचनामे अजून सुरु झाले नाहीत. आम्हाला केवळ नुसत्या घोषणा नको. तर कृती करा, अशी मागणी अजित पवारांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना केली आहे. शेतक-यांना बियाणं कसं मिळेल, त्यांना खतं कसं मिळतील, त्यांचे पंचनामे कसे सुरु होतील, यावर कोणीच बोलत नाही. जे आवश्यक आहे, ते सोडून सगळे बोलत आहेत, असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना धारेवर धरलं.

मी दौरे करतो, ते राजकारण करण्यासाठी नाही. विरोधकाची पण एक इमेज आहे. ती पण महत्त्वाची आहे. दुस-यांनी निवेदन देऊन त्यावर बोलणं, यापेक्षा मी स्वत: पाहणी करुन त्यावर बोलणं, हे जास्त महत्त्वाचं आहे. त्यातले बारकावे, प्रश्नाचं गांभीर्य यामुळे मला जास्त समजलं. जे गरजेचं होतं, असंही त्यांनी नमूद केलं.

त्यामुळे आता अजित पवारांचे निशाणे झालेले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आता या सर्व प्रश्नांवर काय उत्तर देतात आणि काय अँक्शन घेतात, हे पाहणं गरजेचं आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा