हडपसरकरांना वर्षानुवर्षे त्रास देणारी वाहतूककोंडी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या एका दौऱ्यामुळे अचानक गायब झाली! जनसुनावणीला अजितदादा येणार हे कळताच प्रशासनाने गाडीतळ उड्डाणपुलाखालील सगळी अतिक्रमणे एका रात्रीत हटवली.
एरवी भाजी विक्रेते आणि खरेदीदारांनी गच्च भरलेला रस्ता आज स्वच्छ, मोकळा पाहून नागरिक थक्क झाले. काही जण म्हणाले – “असे मंत्री रोज आले, तर आमच्या कोंडीचा प्रश्न कायमचा सुटेल!”
यावरून स्पष्ट झाले की योग्य दबाव आला की प्रशासनकडून काहीही करवून घेता येते. मग रोजच्या सामान्य नागरिकांच्या मागण्यांवर हा चमत्कार का होत नाही, असा सवाल जनतेतून पुढे येतो आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी चंद्रशेखर रहांगडाले











































