सातारा, ३ जुलै २०२३ : राज्याच्या राजकारणात काल जे काही घडलं, त्यामुळे शरद पवार थांबलेले नाहीत. शरद पवार थांबणारा नेता नाही. पवार यांनी कराड येथे दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केले. या ठिकाणी मोठा जनसमुदाय उसळला होता. हे लोकांचे प्रेम आहे. या ताकदीपेक्षा मोठी ताकद कुठलीही होऊ शकत नाही, असे आमदार रोहीत पवार यांनी सांगितले.
अजित पवार यांना विनंती करु शकतो. त्यांचा अनुभव माझ्यापेक्षा खूप मोठा आहे, अशा परिस्थितीत मी त्यांना विनंतीशिवाय काही करु शकत नाही. ते पक्ष सोडून गेल्याने मनाला खूप वाईट वाटले, असे सांगून भाजपला आम्ही विरोध केला होता. आणि त्यांच्याबरोबरच जाणं कितपत योग्य आहे, असा प्रश्न लोकांना पडलेला आहे. जे आमदार काल मुंबईमध्ये दिसले, त्यांना वेगळं काहीतरी सांगितलं होतं. अध्यक्षांच्या बाबतीत चर्चा करायचे आहे, असे सांगून सर्व आमदारांना मुंबईत बोलावले होते.
ज्यांना लोकांमधून निवडून यायचे आहे, ते सर्व आमदार पुन्हा एकदा राष्ट्रवादीत माघारी येतील, असा विश्वास रोहीत पवार यांनी यावेळी व्यक्त केला आहे. कोणत्याही आमदारांना फसवून नेले नव्हते. करण देऊनच त्या ठिकाणी बोलावले होते. ज्यांना शरद पवारांनी विविध पदे दिली. त्यांना मोठे केले, हे सगळे भोगून आज पवारांना धोका देऊन सत्तेत गेले आहेत. असंही रोहीत पवार यांनी सांगितले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर