बीड, १९ ऑगस्ट २०२३ : राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते व खासदार शरद पवार यांच्यापाठोपाठ उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीडला सभा घेणार असे निश्चित झाले होते. यासाठी मंत्री धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी बीडमधील भव्य अशा छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर पाहणीही केली. परंतु आज सकाळी या सभेबाबत संभ्रम निर्माण करणारी माहिती पुढे आली.
यावर आता खुद्द कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनीच स्पष्टीकरण दिले असून २७ ऑगस्टला रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत सभा होणार असून याबाबत कोणताही संभ्रम नसल्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर










































