पुणे, २३ सप्टेंबर २०२२ : महाविकास आघाडी सरकारमध्ये अजित पवार नाराज होते. पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर कार्यकारणी बैठकीत नाराजी व्यक्त केली आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये आपल्याला गृह खातं, पाहिजे होतं पण वरिष्ठांनी ते खातं दिलं नाही अशी खंत पवारांनी बोलून दाखवली आहे.
जेव्हा उपमुख्यमंत्री झालो तेव्हाच गृहमंत्री करा असे बोललो होतो, पण त्यावेळी अनिल देशमुख यांना हे पद दिलं. पण त्यानंतरही मला द्या सांगितलं होतं. तर तेव्हा वळसे पाटलांना गृहमंत्री पद देण्यात आलं, असंही अजित पवार म्हणाले. तसेच वरिष्ठ नेत्यांना वाटतं मला गृहमंत्री पद दिले तर हा आपलंही ऐकणार नाही असे सांगितल्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला होता, पण हे एवढेच खरं आहे की माझ्याकडे गृहमंत्री पद दिल्यानंतर मला जे योग्य वाटतं मी तेच करणार, असे अजित पवारांनी भाषणावेळी सांगितले.
तसेच अजित पवार पुढे बोलतात की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जर कोणी कार्यकर्ता चुकला आणि मला कोणी सांगितले की दादा याला पाठीशी घ्या तर मी त्याला पाठीशी घेणार नाही, पाठीशी पांघरून घालून पांघरून संपण्याची वेळ आली आहे. पण आज जर एखाद्या कार्यकर्त्यावर अन्याय झाला, तर मी त्याच्या पाठीशी उभा राहील, जीवाचे रान करेल, सगळ्यांना समान न्याय देतो, असे सांगत कार्यकर्त्यांविषयी आपलं मत स्पष्ट केलं.
न्यूज अनकट प्रतिनिधी: वैभव शिरकुंडे