अजित पवारांच्या उपमुख्यमंत्री पदानंतर बारामतीत आनंदाचे वातावरण

बारामती : महाराष्ट्र राज्याच्या सत्ता स्थापनेच्या नाट्यमय घडामोडीनतंर वेगवेगळ्या विचार सरणीच्या तीन पक्षांनी एकञ येत सत्ता स्थापन केले. सत्ता स्थापनेनतंर लांबलेला मंञीमंडळाचा विस्तार आज अखेर झाला.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानतंर कोणाला कोणते मंञीपद मिळणार याबाबत सर्वच जण आपआपल्या पध्दतीने कयास बांधत होते. मात्र त्याच वेळी बारामतीला कोणते मंत्रीपद मिळणार याची कमालीची उत्सुकता होती. आज अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपद मिळाले असून बारामतीकरांच्यात उत्साहाचे वातावरण असून आनंद व्यक्त केला जात आहे.
१४ व्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानतंर अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. महाराष्ट्रात प्रथमच तीन पक्ष एकञ येत ऐतिहासिक महाविकास आघाडी स्थापन होऊन सरकार स्थापन झाले. मात्र, तद्पुर्वी अजित पवारांनी सत्ता स्थापनेची बोलणी सुरु असतानाच कोणत्या पक्षाला किती व कोणती मंत्रीपदे मिळावीत, याबाबत एक वाक्यता होत नसल्याच्या कारणावरुन अचानक भाजपाशी हातमिळवणी करुन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन राज्याच्या राजकारणात राजकीय भुकंप घडवून आणला होता.
अजित पवार यांनी त्यावेळी घेतलेल्या निर्णयामुळे बारामतीकरांच्यात व्दिदा मनस्थितीत निर्माण झाली होती. काही बारामतीकारांनी अजित पवारांच्या निर्णयाचे स्वागत केले होते. तर काही शरद पवार यांचे समर्थन करित होते. राज्यभरात या निर्णयाची साधकबाधक चर्चा झाल्यानतंर उपमुख्यमंञी पदाचा राजीमाना देवून अजित पवार पुन्हा आघाडीत सामील झाले. त्यानतंर नव्याने स्थापन झालेल्या सरकार मध्ये मुख्यमंत्री पदासह सहा आमदारांनी मंञी पदाची शपथ घेतली होती.
आज उर्रवरीत मंत्रीमंडळाचा विस्तार होऊन अजित पवार यांना उपमुख्यमंत्री हे पद मिळाले असून त्यांच्या शपथविधीनतंर बारामतीत कार्यकर्त्यांनी एकच वादा अजित दादा, एकच साहेब पवार साहेब, अशा घोषणाबाजी करित राष्ट्रवादीभवनसह शहरातील प्रमुख चौका चौकात फटाके फोडून जल्लोष केला.
……………………………

बारामतीकरांची इच्छापूर्ण..
अजित पवारांना कोणते मंत्रीपद मिळणार याची उत्सुकता आज अखेर संपलीआज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ अजित पवारांनी घेतली आणि बारामतीकरांची इच्छा पूर्ण झाली. बारामतीकरांनी अजित पवारांना सर्वाधिक मताने निवडून दिले आहे. विधानसभेच्या निकालानंतर झालेल्या राजकीय नाट्यमय घडामोडीनंतर शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस यांचे सरकार स्थापन झाले हे समीकरण जुळून आल्यापासूनच राज्याच्या उपमुख्यमंत्रीपद अजित पवार यांनाच संधी मिळणार असा अंदाज बांधला जात होता. व बारामतीकरांची इच्छाही तीच होती. आज शपथविधी पूर्ण झाला. अजित पवारांना उपमुख्यमंत्री पद मिळावे अशी इच्छा बारामतीकरांची होती ती  पूर्ण झाली.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा