अजित पवारांनी कधीही सुडाचे राजकारण केले नाही- विश्वास देवकाते

बारामती : माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष रंजन तावरे यांनी माझ्यावर आकसापोटी खोटा गुन्हा दाखल केला असल्याचे सांगितल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांशी बोलताना या प्रकरणात अजित पवार यांचा काहीही संबंध नाही हे प्रकरण शरद पतसंस्थेतील अपहार प्रकरण आहे. येणाऱ्या माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत सहानुभूती मिळावी, म्हणून तावरे बिनबुडाचे आरोप करत आहेत.
शरद पतसंस्थेतील झालेल्या अपहार प्रकरणी सुरेश खलाटे यांना २०११ मध्ये कर्ज घेतले होते तर २०१९ पर्यंत पतसंस्थेच्या खलाटे यांनी कोणतीही कारवाई का केली नाही. खलाटे हे तावरे जूने सहकारी व विश्वासू निकटवर्तीय आहेत. २०१९ मध्ये खलाटे यांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दाखल केली होती.
त्याप्रमाणे तावरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात अजित पवार यांचा काहीही संबंध नाही. मात्र रंजन तावरे व त्याचे भाऊ, पुतणे यांनी आज दादागिरी करत माळेगाव बंद करण्यात आले यामध्ये शाळा, कॉलेज, बाजारपेठ, भाजी मंडई बंद करून फेब्रुवारी मध्ये होणाऱ्या माळेगाव कारखान्याच्या नुवडणुकीत सभासदांची सहनुभीती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.
अजित पवार यांच्यावर आरोप करत आहे. पवार कुटुंबीयांनी कधी असे सुडाचे राजकारण केले नसल्याचे संभाजी हॊळकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. खलाटे यांनी तक्रार दिली त्यावेळी युतीचे सरकार होते. या प्रकरणात पवार यांचा काहीही संबंध नाही. मात्र राजकारणात या प्रकरणाचा फायदा घेण्यासाठी रंजन तावरे हे अजित पवार यांचे नाव घेत असल्याचे होळकर यांनी सांगितले. खलाटे हे पतसंस्थेचे थकबाकीदार असताना त्यांनी तावरे यांच्या पॅनलमधून निवडणूक कशी काय लढवली हा तावरे व खलाटे यांचा वैयक्तिक व्यवहार आहे. खलाटे यांना माळेगाव कारखान्यात अपात्र ठरवत संचालक पदावरून चुकीच्या पद्धतीने काढल्याने खलाटे हे बाहेर पडले.
मात्र रंजन तावरे हे येणाऱ्या माळेगाव कारखान्याची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन सभासदांची दिशाभूल करत असल्याचे तसेच या प्रकरणात अजित पवार यांचा काहीही संबंध नसल्याचे पत्रकार परिषदेत पत्रकारांशी बोलताना सांगितले.
यावेळी करखायचे माजी अध्यक्ष बाळासाहेब तावरे, माजी जिल्ह परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, मदानराव देवकाते, बारामतीचे गटनेते सचिन सातव,उपनागराध्य नवनाथ बल्लाळ, एस .एन. जगताप, दत्तात्रय येळे, संदीप जगताप, ताजीराव गावडे संग्राम सोराटे यावेळी उपस्थित होते.

जे पेरलं तेच उगवणार सहकाऱ्यांनी मोठे केले त्यांनी माळेगाव कारखाना निवडून देण्यात मोलाचे सहकार्य केले. मात्र त्यांना पतसंस्थेचे कर्ज देऊन वेसण घालायचे आणि त्यांनी बोलायचा प्रयत्न केला तर लगाम घालायचा तुम्ही जसे करणार तसेच तुमच्या पुढे येणार केलेली चुक निस्तारण्यासाठी हा सगळा खटाटोप आहे.अजित दादांनी कधी कुरघोडीचे राजकारण केले नाही त्याची बदनामी करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे.
– विश्वासराव देवकाते,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा