मुंबई, २ जुलै २०२३: आज सकाळीच देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादीच्या सगळ्या उच्चपदस्थ नेत्यांची बैठक सुरू झालेली, यात राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष बदलण्याची घोषणा होणार असं वाटत असतानाच, राज्याच्या राजकारणात अजित पवार रुपी बीपरजॉय वादळ निर्माण झाल असून हे वादळ राष्ट्रवादीच्या ३० आमदारांना उडवून त्यांना सोबत घेऊन आता राजभवनावर धडकलय.
राज्याच्या आणि देशाच्या राजकारणावर या अजितदादा रुपी वादळाने खोलवर परिणाम होणार अस दिसतंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांची दोन दिवसाखाली देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत गुप्त बैठक झाल्याचे आता समोर येतय. सध्या राजभवनावर शिंदे, फडणवीस, अजित पवार यांच्या सोबत तीनही पक्षाचे आमदार उपस्थित असून अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असून थोड्याच वेळात मंत्रिमंडळाचा विस्तार होईल.
शिंदेसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुतांशी महत्वाचे आमदार नेते आता मंत्रिपदाची शपथ घेतील असे सूत्रांकडून पक्के कळते. आता शरद पवारांच्या प्रतिक्रियेची वाट सगळा देश बघत आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.